Pune  SAAM TV
मुंबई/पुणे

Pune News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल; कोणते मार्ग बंद, कोणते सुरू? वाचा सविस्तर

Pune Traffic Police Impose Restrictions for Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebrations: १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात तात्पुरते वाहतूक मार्ग बदल आणि पार्किंग निर्बंध लागू.

Bhagyashree Kamble

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे. या जयंतीनिमित्त पुणे शहरातील विविध भागातून भव्यदिव्य रॅली काढली जाते. तसेच मिरवणुकाही काढल्या जातात. डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांचीही गर्दी जमते. याच पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, वाहतूकीमुळे कुठेही गोंधळ होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक पोलीस विभागाकडून तात्पुरते मार्गबदल तसेच पार्किंग निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुख्य मार्गावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे असतील..

पुण्यातील शाहिर अमर शेख चौक, आरटीओ चौक, पुणे स्टेशन चौक, जीपीओ चौक, नरपतगिरी चौक, बॅनर्जी चौक येथे वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी केले आहेत.

पार्किंग सुविधा

आरटीओ शेजारील एसएसपीएमएस मैदान.

तुकाराम शिंदे पार्किंग, पुणे स्टेशन.

ससून कॉलनी.

तसेच डॉ. कोयाजी रोड, ईस्कॉन मंदिर चौक, नाझ चौक येथील वळविण्यात येणार आहे.

पार्किंगची ठिकाणे

वाहनधारक आपली वाहने:

तारापोर रोड.

ईस्ट स्ट्रीट.

पे अँड पार्कची जागा.

विश्रांतवाडी परिसर

विश्रांतवाडी चौक, बोपखेल दिघी, भोसरी आळंदी आणि टिंगरेनगरकडे जाणाऱ्या अन् येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या मार्गांची आखणी. या ठिकाणी दुपारी ३ वाजल्यापासून निर्बंध लागू होतील.

दांडेकर पूल परिसर

स्वारगेट, सेनादत्त चौक, आशा हॉटेल चौक, मांगीरबाबा चौक याठिकाणी वाहतूक वळविली जाणार आहे.

बाजीरा रोड आणि गणेश रोड

पुरम चौक, लाल महाल चौक आणि लक्ष्मी रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर आवश्यकता भासल्यास वाहतूक बंदी केली जाणार आहे.

निर्बंध लागू होण्याची वेळ

१४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मिरवणुका आणि गर्दी संपेपर्यंत वरील सर्व मार्गावर लागू राहिल. विश्रांतवाडीत मात्र दुपारी ३ वाजल्यापासून निर्बंध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT