Thane News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस या वाहनांना बंदी; वाचा संपूर्ण माहिती

Thane Ghodbunder Road News : ठाण्यातील घोडबंदर रोडवर दुरुस्तीच्या कामामुळे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  • गायमुख जंक्शन ते नीरा केंद्रादरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम

  • प्रवाशांसाठी माजिवडा व कापूरबावडी मार्ग पर्यायी रस्ते

  • रस्त्यावरील कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे

ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे तसेच वाहतूक कोंडी फोडण्याचे आश्वासन यापूर्वीही अनेकांनी दिली. मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील वाहतूक कोंडी जैसे थे च आहे. दरम्यान पुढील तीन दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस जड-अवजड वाहनासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रोड दुरुस्तीच्या कामांसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे. घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस जड-अवजड वाहनासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख जंक्शन ते मुख्य नीरा केंद्रापर्यंत ठाण्याच्या दिशेने या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे १२,१३,१४ डिसेंबर या दिवसात अवजड वाहनासाठी वाहतूक बंद असणार आहे.याकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर वाहतूक विभागाकडून करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. माजिवडा (Y जंक्शन) मार्गे खारेगाव मार्गे पुढे जाता येईल किंवा कापूरबावडी जंक्शन मार्गे भिवंडीच्या दिशेने पुढे जाता येईल.

या मार्गाचा वापर करून वाहन चालकांना आपल्या इच्छित स्थळी जाता येईल. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढतच आहे. या घोडबंदर रोड वर राहणाऱ्या नागरिकांनी यासाठी जन आंदोलन देखील उभारले होते. मात्र अद्यापही रस्त्याची परिस्थिती जशीच्या तशीच असल्याचे पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरचा महापौर मुंबईत ठरणार; सुजय विखे पाटील यांची माहिती

Lipstick Types: डेली वेअर किंवा पार्टीसाठी कोणती लिपस्टिक आहे परफेक्ट?

MLA Harish Daroda: अजित पवारांच्या आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू, घोटाळा प्रकरणात होता अटकेत

India Post Recruitment 2026: परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

Google search: गुगलवर सर्वात प्रथम कोणता शब्द सर्च केला गेला?

SCROLL FOR NEXT