Mumbai Local Traffic Disrupted Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Local Train derailed : लोकलचा डबा रुळावरून घसरला; अंबरनाथजवळ अपघात; मध्य रेल्वे विस्कळीत

Priya More

अजय दुधाणे, अंबरनाथ

Central Railway: मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली. त्यामुळे कल्याण ते कर्जत (Kalyan- Karjat Local) डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर देखील झाला आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सायडिंगला असलेली लोकल मेन लाईनवर येत असताना लोकलचा डबा अचानक रुळावरुन घसरला. अंबरनाथ - बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सकाळी 8.20 वाजता ही घटना घडली. यामुळे कल्याण-कर्जत लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचसोबत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.

पण, बदलापूर-कर्जत वाहतूक सुरू आहे. रुळावरुन घसरलेल्या लोकलमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे लोकल सेवेसोबत रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला आहे. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. 18520 एल टी टी - विशाखापट्टणम एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकावर थांबून आहे. तर बदलापूर लोकल आणि अंबरनाथ लोकल उल्हासनगर स्थानकाजवळ थांबून आहेत.

लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत पुढच्या स्थानकावर जात आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या आणि महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेसेवा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामासाठी एक ते दीड तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT