old pune mumbai highway Traffic SAAM TV
मुंबई/पुणे

Old Mumbai Pune Highway Traffic Update : कामशेत खिंडीत 6 अवजड वाहनं बंद पडली, पुण्याकडील वाहतूक खाेळंबली

Mumbai Pune Highway Traffic : आजही नेहमीप्रमाणे कामगार वर्ग घराबाहेर पडला. परंतु अवजड वाहने बंद पडल्याने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वाहतूक खाेळंबली.

दिलीप कांबळे

Maval News :

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर (old mumbai pune highway) मुंबईवरून पुण्याला जातानाच्या मार्गावर आज (मंगळवार) सकाळपासून वाहतुकीचा बाेऱ्या उडाला आहे. तब्बल सहा अवजड वाहने (heavy vehicles) बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. (Maharashtra News)

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत अवघड वळणावर अवजड वाहनं चढावावर जाताना एक नाही तर, तब्बल सहा वाहनं बंद पडली आहेत. दुसऱ्या वाहनांना अनेक अडचणी निर्माण झाल्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती अडकून पडल्याचे दिसून येत आहे.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन सकाळी कामावर जाण्यासाठी अनेक जण या महामार्गाचा वापर करतात. आजही नेहमीप्रमाणे कामगार वर्ग घराबाहेर पडला. परंतु अवजड वाहने बंद पडल्याने महामार्गावरील वाहतुक खाेळंबली. परिणामी अनेक वाहनधारकांकडून कामावर जाण्यास उशिर हाेत असल्याची खंत व्यक्त हाेत हाेती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT