मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी मोठा प्लान आखला आहे. यामुळे लवकरच महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार असून प्रवास सुसाट होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशी लेन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार असून या कामासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्याचा सहापदरी द्रुतगती महामार्ग ‘अष्ट’पदरी करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.(Latest Marathi News)
यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) देशातील सर्वात पहिला महामार्ग म्हणून ओळखला जातो. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानीला जोडता यावी, तसेच दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे म्हणून हा महामार्ग उभारण्यात आला आहे.
या महामार्गाचे काम पूर्ण होऊन जवळपास २० वर्षांहून अधिक कालावधील लोटला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज धावणाऱ्या वाहनांची क्षमता ६० हजारांच्या दरम्यान ठेवण्यात आली होती. आता महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे.
सध्या एक्सप्रेस वेवरून दिवसाला ८० हजारपेक्षा अधिक वाहने धावतात. याच कारणामुळे अनेकदा घाटात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता रस्ते विकास महामंडळाकडूनच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.