Shaniwar Wada SAAM TV
मुंबई/पुणे

Shaniwar Wada : सुट्टी मिळताच पर्यटक शनिवार वाड्यावर! ३ दिवसांत १५ हजारांहून अधिक लोकांची गर्दी

Shaniwar Wada Travel : सुट्टी सुरू होताच पर्यटक पिकनिकचे प्लान करतात. त्यामुळे पर्यटन स्थळे गजबजलेली पाहायला मिळतात. अशात आता शनिवार वाड्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

नवीन वर्षाला आता काहीच दिवस उरले आहेत. नवीन वर्षाचे आगमन आणि ख्रिसमसमुळे यांमुळे मोठी सुट्टी मिळाली आहे. सुट्टी मिळताच आपण फिरण्याचे प्लान करायला लागतो. या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळे गजबजलेली पाहायला मिळतात. याची सुरुवात आता झाली आहे. सुट्ट्यांमध्ये पर्यटकांचा पुण्याकडे ओढ वाढला आहे.

सलग सुट्ट्या आल्याने पुण्यातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाने रोखीचे व्यवहार आणि डिजिटल व्यवहाराद्वारे तिकीट विक्री सुरू ठेवण्याऐवजी फक्त डिजिटल तिकीट विक्री सुरू केली आहे. यामुळे एकाच वेळी हजारो पर्यटक प्रवेशद्वारावरच खोळंबून मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी माहिती घेताना पाहायला मिळत आहे. यामुळे पर्यटकांना खूप मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. तर पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुण्यात शनिवारवाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस, पर्वती, नाना वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जोगेश्वरी मंदिरांसह सर्व ठिकाणी पर्यटकांनी गर्दी पाहायला मिळत आहे. ही सर्व स्थळे पर्यटकांचे आकर्षण आहे. पुण्यात विशेष म्हणजे तीन दिवसांत तब्बल 15 हजार पर्यटकांनी शनिवार वाड्याला (Shaniwar Wada) भेट दिली आहे. अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील विविध पर्यटन स्थळे, मंदिरे, बागा पर्यटकांच्या गर्दीने फुलल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पर्यटक उत्साहाने फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पुण्याला वीकेंडला खूप गर्दी पाहायला मिळत आहे. परदेशी पर्यटकही शनिवार वाडा पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT