राज्यातील महामार्गावरील टोलदरात वाढ १ ऑक्टोबरपासून करण्यात आली. टोलदर वाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. टोल फ्री करावेत या मागणीसाठी मनसेची मागणी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी नवी मुंबईत आंदोलनाला सुरूवात केली. (Latest News)
ऐरोली, ठाणे आणि पनवेल शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. यामुळे टोल नाक्यावरून राजकारण तापणार आहे. दरम्यान राज्यातून रुपयांचा टोल जमा होता. मुंबईत जाण्यासाठी वाहनचालकांना किती टोल भरावे लागतात याची माहिती घेऊ. मुंबईत येण्यासाठी वाहनचालकांना पाच टोल नाक्यावर टोल भरावा लागतो.
दरम्यान दर ३ वर्षांनी टोल दरात वाढ केली जाते. यापूर्वी २०२० मध्ये टोल दरात वाढ करण्यात आली होती. मुंबईच्या वेशीवरील ऐरोली, दहिसर पच्छिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल आहेत. या टोल नाक्यावर किती भरावा लागतो टोल
कार साठी ४५ रुपये टोल
मिनी बससाठी -७५ रुपये
ट्रक/बससाठी - १५० रुपये
अवजड वाहनांसाठी -१९० रुपये. तसेच या टोलनाक्यांवर आतापर्यंत १५०० रुपयात मासिक पास मिळत होता. मात्र यामध्ये शंभर रुपयांची वाढ करण्यात आलीय. मासिक पाससाठी १६०० रुपये भरावे लागत आहेत. ( हे देण्यात आलेले दर हे वाढवलेले दर दिलेत).
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल नाक्यांवरील दर देखील वाढल्या आहेत. ३१६ रुपये कारसाठी भरावा लागतो. तर बससाठी ९४०, ट्रकसाठी ६८५, टेम्पोसाठी ४९५ रुपये दर भरावे लागतात. तर एम एक्सेलसाठी २१६५ रुपये मोजावे लागतात. तसेच अपघातामुळे चर्चेत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरही मोठ्या प्रमणात टोल वसूल केला जातोय.
नागपूर ते शिर्डीदरम्यान असलेल्या ५०० किमीच्या समृद्धी महामार्गवर १४ टोल नाके आहेत. या टोलवर वाहन चालकांना १ रुपये ७५ पैसे प्रमाणे टोल आकरला जातो. तर पूर्ण समृद्धी महामार्गावर १७ टोलनाके होतील. तर मुंबई-गोवामार्गावर कारसाठी एकूण ७१५ रुपयांचा टोल भरावा लागतो. सात ठिकाणच्या टोल नाक्यावर वाहन चालकांना टोल भरावा लागतो.
राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागातील ३८ टोल नाक्यापैकी ११ टोल बंद करण्यात आलेत. हे टोल बंद केल्यामुळे २२६.५१ कोटी रुपये परतावा रक्कम देण्यात आलीय. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील ५३ टोल नाक्यापैकी १ टोल नाका बंद झालाय. त्यासाठी उद्योजकाला परतावा रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या टोल नाक्यातील बंद न झालेले १९ प्रकल्पावरील २७ टोलवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टॅक्समध्ये सूट देण्यात आली होती.
यामुळे उद्योजकाला वर्ष २०२१५-१६ करताची भरपाई रक्कम म्हणून १७९.६९ कोटी देण्यात आले होते. ही आकडेवारी आरटीआय अधिकारी अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारामार्फत मिळवली होती. ही आकडेवारी सरकारने २०१६ मध्ये जाहीर केली होती..
सध्या राज्यात चालू असलेल्या टोलवरील राजकारणावर बोलताना अनिल गलगली म्हणाले की, टोल माफ ही कल्पना अत्यंत चुकीची आहे, कारण टोल माफ केल्यावर जे एकरक्कमी पैसे दिले जातात ते पैसे आपलेच असते कराचे पैसे असतात. शासनाने एक श्वेत पत्रिका जाहीर केली पाहिजे. यात महाराष्ट्रात किती टोल आहे किती रक्कम दिली जाते आणि किती वर्ष हे चालणार याची माहिती दिली पाहिजे. शासनाने जर श्वेत पत्रिका जाहीर केली तर टोल आणि त्याचा झोल बाहेर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.