Maharashtra Weather Update Saam tv
मुंबई/पुणे

Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचे तापमान वाढले आहे. पुढील ३-४ दिवस तापमान वाढीचे संकेत आहेत, त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता. बदलत्या हवामानाने नागरिक त्रस्त.

Alisha Khedekar

  • अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान १०°C च्या वर गेल्यामुळे गारठा कमी

  • पहाटे धुकं व थंडी, दुपारी उन्हाचा कडाका या बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त

  • पुढील ३–४ दिवस तापमान वाढणार

  • बदलत्या वातावरणाने आजारांना आमंत्रण

राज्यात थंडीची गुलाबी चादर पसरली असून काही ठिकाणी अंशतः तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी हुडहुडी आणि दुपारी उन्हाचा कडाका कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढला असून गारवा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी हुडहुडी कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम असला, तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या पुन्हा वर गेला आहे. पहाटे थंडी सोबतच धुकं दिसतं असून हवेत थंडी जाणवत आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, निफाड, बीड, अहिल्यानगर, कोल्हापूर, माथेरान या ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.७ अंश सेल्सिअस, तर भंडारा येथे पारा १० अंशांवर आल्याने गारठा कायम आहे.

काल म्हणजेच गुरुवारी कोकणातील रत्नागिरी येथे ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवत असून, उकाड्यात काहीशी वाढ होत आहे. आज राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सतत बदलत राहणाऱ्या हवामानाने नागरिकांना त्रस्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: मोठी बातमी! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Navi Mumbai Tunnel: नवी मुंबईचा कायापालट होणार, पाम बीचखालून जाणार भुयारी मार्ग; नेमका प्लान काय?

Liver cancer: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर लवकरच खराब होणारे; दुर्लक्ष केल्यास कॅन्सरही होऊ शकतो

Muesli Benefits: नाश्त्याला मुसली खाण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT