Mahrashtra Weather Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा

Today Maharashtra Weather Update News : मकर संक्रांतीनंतर राज्यात थंडी कमी झाली असून किमान तापमानात वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • मकर संक्रांतीनंतर राज्यात थंडीचा गारठा कमी झाला आहे

  • किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे

  • ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

  • हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूसह आजारांचा धोका वाढला आहे

राज्यात मकर संक्रांतीनंतर थंडी कमी झालेली पाहायला मिळते आहे. किमान तापमानात सतत होणाऱ्या चढ उतारामुळे वातावरणातील गारठा काहीसा कमी झाला आहे. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामान होत आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून, काहीसा उकाडा अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात वाढ कायम राहणार असून थंडी कमी - अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वातावरणात सतत होणाऱ्या बदलावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन थंडीत उन्हाचा चटका आणि अवकाळी पडणारा पाऊस अशा संमिश्र वातावरणाने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

बदलत्या वातावरणाचे आजारांना निमंत्रण

नागपूरमध्ये नववर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण समोर आले असून शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून थंडीच्या काळात विषाणूजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शिवाय थंडीचा काळ स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरणारा असतो तापमान घटल्याने संसर्ग वाढण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

दिल्लीतील वातावरण बदलले

दिल्लीतील हवामानाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियस इतकी घट झालेली पाहायला मिळाली. त्यांनतर काल दिल्लीतील अनेक भागात पावसाने दमदार बॅटिंग केली. दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फिरायला गेलेल्या नागरिक मात्र पेचात सापडले. ऐन थंडीत सुरु झालेल्या पावसामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: BP नियंत्रणात ठेवण्यासाठी ही 5 पदार्थ खाणं अजिबात टाळू नका

Amruta Khanvilkar : क्या खूब लगती हो, बडी सुंदर देखती हो, पाहा अमृताचं लेटेस्ट PHOTOS

Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

Ardha Kendra Yog: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार दुर्मिळ योग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Maharashtra Live News Update: महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित

SCROLL FOR NEXT