मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray)आज ९६ वी जयंती आहे. या निमित्ताने दादर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी मोठ्या वर्मांना सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्याकरिता अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होत आहेत. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने (Balasaheb Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.
हे देखील पहा-
प्रत्येकवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. पण मागील २ वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जात असतात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज शिवसैनिकाबरोबर संवाद (Shivsainik) साधणार आहेत. आज ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकाबरोबर संवाद साधणार आहेत. आज २३ जानेवारी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकाबरोबर संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देणार आहेत. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री ८ वाजता शिवसैनिकाबरोबर संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.