Titwala News  Saam Tv
मुंबई/पुणे

Titwala Crime: होळी खेळताना मित्रांची मस्करी जीवावर बेतली, गुदद्वारात उच्च दाबाच्या पाण्याचा फवारा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Holi Tragedy in Titwala: टिटवाळ्यामध्ये मित्रांच्या मस्करीमुळे तरुणांला आपला जीव गमवावा लागला. होळी खेळताना तरुणाच्या मित्रांनी त्यांच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या पाण्याचा फवारा मारला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

अभिजित देशमुख, टिटवाळा

टिटवाळ्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडला. मित्रांच्या विकृत मस्करीने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गुदद्वारात उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. टिटवाळ्यानजीकच्या वरप गावामध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळाजवळील वरप गावात धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली. मित्रांच्या विकृत मस्करीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. वरप गावालगत असलेल्या महाराजा लॉन्स येथे काम करणारे चार मित्र धुलीवंदनाच्या दिवशी खेळत होते. याच दरम्यान तीन मित्रांनी एका मित्राला उलटे पाडून पॅन्टमध्ये उच्चदाबाच्या पाण्याचा फवारा असलेला पाईप घातला.

पाणी त्याच्या गुदद्वारात गेल्याने या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सत्यप्रकाश उपाध्याय असे या मृत तरुणाचे नाव आहे. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी विकृत मस्करी करणाऱ्या त्याचे ३ मित्र मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी टिटवाळा पोलिस पुढील तपास करत आहेत .

टिटवाळाजवळील वरप गावाजवळ महाराजा लॉन्स आहे. याच लॉन्समध्ये सत्यप्रकाश उपाध्याय आणि त्याचे तीन मित्र मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा याच लॉन्समध्ये काम करत होते . धुलीवंदनाच्या दिवशी लॉन्समध्ये हे चौघे मित्र धुलीवंदन साजरी करत होते. याच दरम्यान चौघांनी दारू प्यायली होती. दारूच्या नशेत मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा या तिघांनी सत्यप्रकाशला खाली झोपवले. आणि पाठच्या बाजूने पॅन्टमध्ये उच्च दाबाच्या पाण्याचा फवारा मारला.

गुदद्वारात उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारण्यात आलल्याने सत्यप्रकाश गंभीर जखमी झाला. सत्यप्रकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तातडीने तपास करून मृत्यू झालेल्या सत्यप्रकाश उपाध्यायच्या तिघा मित्रांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा अशी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT