Tirupati Balaji Temple  Saam tv
मुंबई/पुणे

Tirupati Balaji : डोंबिवलीत तिरुपती बालाजीचे थेट दर्शन होणार, कुठे अन् कधी? जाणून घ्या

Tirupati Balaji temple : ज्या नागरिकांना वेळेअभावी पैसे अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही, त्या नागरिकांना तिरुपती बालाजीचे अनुभूती घेता येणार आहे. या कार्यक्रमाविषयी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Latest News :

तिरुपती बालाजी देवस्थान आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली-कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामुळे ज्या नागरिकांना वेळेअभावी पैसे अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही, त्या नागरिकांना तिरुपती बालाजीचे अनुभूती घेता येणार आहे. या कार्यक्रमाविषयी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. (Latest Marathi News)

कसं असेल कार्यक्रमाचं स्वरुप?

डोंबिवलीच्या प्रीमियर कंपनी मैदानात तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थान येथील मंदिरातील बालाजी देवाची प्रत्यक्ष मूर्ती भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. रविवारी २५ फेब्रुवारीला या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. 25 तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून तर रात्री साडेदहा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमात विविध पूजा, शोभायात्रा, श्रीदेवी व भुदेवीचे भगवान स्वामी व्यंकटेश्वरांसोबत दिव्य लग्नाची अनुभूती भाविकांना घेता येणार आहे.

बालाजीच्या मूर्तीला सकाळी साडे सहा वाजला मूर्तीला हार अर्पण करण्यात आहे. तिरुपती बालाजीच्या मूर्ती पूजा करण्यासाठी १००८ जोडपी सहभागी होणार आहेत. त्यानंतर या पूजेची दुपारी साधारण साडेअकरा बाराला सांगता होईल. मूर्तीची पूजा करण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी स्वत: येणार आहेत. त्याचबरोबर प्रसाद बनविण्याची जबाबदारी देखील तिरुपती बालाजी मंदिरातून आलेले आचाऱ्यांवर असणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पूजा अर्चा आणि कार्यक्रमाची जबाबदारी ही वारकरी संप्रदाय ठाणे रायगड जिल्हा आणि श्री बालाजी मंदिर सागर्ली, डोंबिवली यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर डोंबिवली-कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळ, विविध धार्मिक व सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली आहे.

डोंबिवलीमधील कार्यक्रमातील श्री बालाजी मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत संपूर्ण आकर्षक व आगळी वेगळी अशी विद्युत रोषणाई असणार आहे. तसेच दक्षिण भारताच्या परंपरेनुसार फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT