Mumbai Crime News, Vasai Crime News, Mumbai Latest Marathi News
Mumbai Crime News, Vasai Crime News, Mumbai Latest Marathi News चेतन इंगळे
मुंबई/पुणे

जमिनीत पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढायची वेळ; प्रेमसंबंधातून झाली होती हत्या

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार: वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला एका तरुणाचा मृतदेह पोलिसांनी बेवारस म्हणून किनाऱ्यावर पुरला होता. मात्र १५ दिवसांनी या मृतदेहाची (Dead Body) ओळख पटली असून त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे. (Time to exhume a corpse buried in the ground; The murder was due to a love affair In Vaisai-Virar)

हे देखील पाहा -

कांदिवली (Kandivali) येथे राहत असलेल्या दीपक कटकुर या २१ वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या वादातून त्याचाच मित्र सूरज विश्वकर्मा याने १२ मे ला त्याची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेह भाईंदर खाडीत फेकून दिला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह २ दिवसांनी म्हणजे १४ मे ला भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहत आला.

कांदिवली पोलीस ठाण्यात दीपक हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना प्रेमसंबंधातून दीपकची हत्या केल्याची कबुली आरोपी सुरज विश्वकर्मा याने पोलिसांना दिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी पुरलेला मृतदेह पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : वेगळ्या विदर्भाच्या मागणसाठी विदर्भवाद्यांच्या जोरदार घोषणा

Lok Sabha Election 2024: कल्याण, ठाण्याचा सस्पेन्स संपला; महायुतीकडून दोन्ही उमेदवारांची घोषणा

Covishield Vaccine : तुम्हीही Covishield लस घेतली आहे? दुष्परिणामांसह तुमच्या जिवाला किती प्रमाणात धोका, वाचा सविस्तर

Summer Tips: उन्हाळ्यात चक्कर येण्याची समस्या ठरतेय गंभीर, कशी घ्याल काळजी?

IPL 2024 Playoffs: इंग्लंडच्या या एका निर्णयाने IPL च्या ५ संघांचं टेन्शन वाढलं; वाचा कारण

SCROLL FOR NEXT