Palghar Accident  
मुंबई/पुणे

पालघरमध्ये भयंकर अपघात, पोलिसांच्या भीतीने पळाले अन् मालगाडीने चिरडले, ३ जणांचा जागेवरच मृत्यू

Palghar Train Accident : पालघर पूर्वेतील जैन मंदिराजवळ मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांच्या भीतीने पळत असताना ते रेल्वे रुळांवर गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

रूपेश पाटील, पालघर प्रतिनिधी

Palghar Train Accident : पालघर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर पूर्वेतील जुना पालघर भागातील जैन मंदिराजवळ ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांच्या भीतीने पळत असताना हे तरुण रेल्वे रुळांवर गेले आणि त्याच वेळी मालगाडीची धडक बसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या किंवा अटकेच्या भीतीने हे तरुण रेल्वे रुळांच्या दिशेने पळत सुटले होते. त्याच वेळी रुळावरून जाणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला, असा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या आरोपामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT