मुंबई/पुणे

Pune: पुणे बोगस नोंदी तपासणीसाठी तीन पथकं तयार, दस्ताची होणार कसून चौकशी

Pune News: मागील दोनवर्षांपासून या कार्यालयामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे हजारो दस्त नोंदणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी आहे.

Dhanshri Shintre

पुणे शहरात अनेक ठिकाणी बोगस दस्त नोंदणी सुरू असल्याची तक्रार जिल्हामुद्रांक अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून. जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या मार्फत तीन पथक तयार करण्यात आली आहेत. हवेली क्र. १३ चे सह दुय्यम निबंधक कासेवाड यांनी तुकडे बंदी, तुकडे जोड कायद्याचा व रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केला असूनत्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्याकडे युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे़.

मागील दोनवर्षांपासून या कार्यालयामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे हजारो दस्त नोंदणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये बनावट एन. ए. ऑर्डर, बनावट भोगवटा प्रमाणपत्र तसेच बोगस बेचाळीस ब च्या एन. ए. ऑर्डरच्या आधारे सुद्धा शेकडो दस्त नोंदविण्यात आले आहे.

अनाधिकृत प्लॉट मधील लिहून देणारा त्याच गटातील आहे, परंतू लिहून घेणारा त्याच गटातील नसताना देखील बोगस हिसेदार दाखवून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी केली आहे. तसेच आपल्या पदाचा गैर वापर करून काही ठराविक एजंटला जवळ करून स्वत:च्या आर्थिक लाभाकरीता सक्षम प्राधिकरणाची परवानगी आणि महा रेरा नोंदणी क्रमांक नसल्यास अशा बांधकामातील सदनिकांची नोंदणी करण्यात येऊ नये.

तसेच ले आउट मंजूर करून प्लॉट पाडून विक्री करण्यात आल्यास अशा दस्तांची नोंदणी करावी. या संदर्भात परिपत्रक नोंदणी महानिरीक्षकांनी काढले आहे. मात्र या कायद्याचे या परिपत्रकाचे उलंघन करून सर्व प्रकारच्या दस्तांची नोंदणी व ग्रामपंचायत मधल्या बिल्डिंगच्या प्लॉटची दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारचे हजारो दस्त करून देखील यावर वरिष्ठांकडुन कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणाची विशेष पथकानुसार चौकशीकरून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सुरवसे पाटील यांनी केली.

यावर सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे म्हणाले की याबाबत तात्काळ आम्ही कारवाई करू तसेच गेल्या काही महिन्यांपासून शहारत आमच्या माध्यमातून विविध पथक तयार करून दस्त नोंदणी बाबत तपास सुरू असून बनावट दस्त करण्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ते होऊ नये यासाठी देखील विशेष पथक तयार करण्यात आलं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रील स्टारकडे आढळला हत्यारांचा साठा

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अशोक खरातचे सगळे कारनामे समोर येणार? SIT ने पुन्हा घेतला ताबा

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

SCROLL FOR NEXT