Pune Railway Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात एकाच रात्री ३ भीषण अपघात, रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू

Three Road Accidents in One Night Pune: पुण्यातील विविध भागात एकाच रात्री तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू तर, ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यात सध्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील विविध भागात एकाच रात्री तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू तर, ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन आणि फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तिन्ही अपघात घडले आहेत. या तिन्ही घटनांमुळे अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच

पु्ण्यातील पहिल्या अपघातात ३४ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा तर दुसऱ्या एका अपघातात ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहिला अपघात

पुण्यातील सासवड रोडवर उरळी देवाची या परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. चारचाकी वाहन मागे घेत असताना वाहनाची महिलेला जोरदार धडक बसली. या धडकेत सिंधुबाई क्षीरसागर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील चालक मनोज अहिरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

दुसरा अपघात

तर दुसरा अपघात काळेपडळ परिसरात घडला आहे. फूड डिल्व्हरी बॉयला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली होती. मझहर जिलानी शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाचा तपास सुरू आहे.

तिसरा अपघात

तिसरा अपघात हडपसर परिसरात घडला आहे. जेएसपीएम कॉलेजच्या समोर एक तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरूणाला पोलीस ठाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT