Minor girl molested crime in navi mumbai saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : चर्चमधील आश्रमशाळेत तीन मुलींवर अत्याचार, ४५ बालकांची सुटका, काय आहे प्रकरण?

चर्चमधील पास्टर रात्री मुलींच्या अंगाला तेल लावून त्यांना गुंगीचे औषध द्यायचा, त्यानंतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धार्थ म्हात्रे

नवी मुंबई : सीवूड येथील एका चर्चमध्ये बेकायदेशीरपणे आश्रमशाळा (Navi mumbai crime) चालवली जात होती. या शाळेत असलेल्या ४५ अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Minor Molestation) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेत सुरु असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने पर्दाफाश केला आहे. चर्चमधील पास्टर रात्री मुलींच्या अंगाला तेल लावून त्यांना गुंगीचे औषध देऊन झोपवून ठेवायचे. त्यानंतर मुलींवर अत्याचार केल्यामुळं एक मुलीचा गर्भपात केल्याचाही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Pocso Case Filed) करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चमधील एका अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून चर्च व्यवस्थापकांच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने चर्चमध्ये सुरु असलेल्या आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा पर्दाफाश केला. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT