This is Mumbai and Mumbais grandfather is Shiv Sena Sanjay Rauts warning to ED Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: "ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे"- राऊतांचा ईडीला इशारा

Sanjay Raut On ED: मुंबईत ईडी कार्यालासमोर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन ईडीचा भांडाफोड करणार असा जाहिर इशारा त्यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष तथा भारताचे उप-राष्ट्रपती वैंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांना पत्र लिहित तपास यंत्रणांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. काल (८ फेब्रुवारी) त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना (Hon'ble Chairman of Rajya Sabha) हे पत्र लिहिलं होतं, ज्यात तपास यंत्रणांकडून त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी (Sanjay Raut) केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातलं सरकार हे विरोधकांचा आवाज आणीबाणीपेक्षाही भयंकर वागतंय असं राऊत म्हणाले. ("This is Mumbai and Mumbai's grandfather is Shiv Sena" - Raut's warning to ED)

हे देखील पहा -

राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकार (Mahavikas Aghadi Government) आल्यापासून हे सुरु झालं आहे. सध्या ईडी (ED) किंवा इतर तपास यंत्रणा ज्याप्रमाणे काम करतात त्याला मी क्रिमीनल सिंडिकेट म्हणतो. हे लोक ठाकरे, पवार यांसारख्या घराण्यांना बदनाम करतात. हे लोक स्वतः मनी लॉन्ड्रींग करतात असा गंभीर आरोप त्यांनी ईडीवर केला आहे. आम्हाला कोठडीत पाठवण्याच्या धमक्या देतायत, त्याच बाजूच्या कोठडीत तुम्हालाही बसवू. ईडीच्या कार्यालयात काय होतंय, हे लवकरच दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाल्या आणि मंडपवाल्या लोकांनाची यांनी उचललं, गन पॉईंटवर लोकांना उचलून आणलयं. महाराष्ट्रातील जनतेला हे लोकं जबरजस्तीने उचलतात, टॉर्चर करतात असा आरोपही राऊतांनी केलंय. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच मुंबईत ईडी कार्यालासमोर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन ईडीचा भांडाफोड करणार असा जाहिर इशारा त्यांनी दिला आहे.

हे सरकार पाडण्यासाठी भाजपचा हा आटापिटा सुरु आहे असा आरोप त्यांना केला आहे. सरकार पाडण्याचा प्रतिकार करणाऱ्या आमच्यासारख्या मुख्य नेत्यांना हे लोक अडकवतायत असा आरोपही संजय राऊतांनी केली आहे. तसेच आम्ही घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी फडणवीसांना नाव न घेता दिला आहे. ईडीच्या कार्यालयात बसून आदेश देणारे कोण आहेत? ईडीला याची किंमत मोजावी लागेल आणि यासाठी मी कोणतीही किंमत मोजेल असंही राऊत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT