Election Commission on Maharashtra Election Saam Tv
मुंबई/पुणे

Election commission PC Live: राज्यात 'या' मतदारसंघात होतं सर्वात कमी मतदान, जम्मू - काश्मीरचा दाखला देत निवडणूक आयुक्त काय म्हणाले? वाचा...

Satish Kengar

केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम ही दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर होती. यानंतर आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, सहआयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस एस संधू यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच राज्यात सर्वात कमी मतदान कुठे होतं याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

राज्य सर्वात कमी मतदान कोणत्या मतनदारसंघात होतं?

पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, ''राज्यात कुलाबा, कल्याण, पुणे कँफ, कुर्ला यासारख्या ठिकाणी कमी मतदान होतं. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे. जम्मू कश्मिरपेक्षाही कमी मतदान महाराष्ट्रात काही शहरी भागात होत आलेय. लोकांनी मतदानासाठी घराबाहेर करावे. आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी मतदारांनी घराबाहेर पडावे.''

पत्रकारांना संबोधित करताना राजीव कुमार म्हणाले की, ''सर्व पक्षांनी हे सांगितलं आहे की, सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख ठरवावी. प्रत्यक बूथवरती मतदारांना मोबाईल आणल्यावर बाहेर ठेवायला समस्या येते. त्यावर उपाययोजना करा.''

ते पुढे म्हणाले, राजकीय पक्षांनी असंही सांगितलं आहे की, शहरात आणि गावाकडे मतदानाची सुविधा करण्यासाठी शराच्या मधोमध करा. मोबाईल घेऊन जाण्यासाठी सुविधा करून देण्यात यावे. पोलिंग स्टेशन लांब असल्यास मतदारांना तिथे सहज पोहोचता यावं, यासाठी सुविधा करण्यात यावी.

राजीव कुमार म्हणाले की, ''नवीन मतदार वाढवण्यावर भर देणार आहे. कारण ते पुढे जाऊन मतदान करणार आहेत. महिला मतदारांची संख्या वाढली आहे. राज्यात 1 लाख 186 पोलिंग बूथ आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार? 1 ऑक्टोबरला 'घड्याळ'चा फैसला?

Maharashtra Politics : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ

Husband Killed Wife : जेवण बनवलं नसल्याने रागाच्या भरात नवऱ्याने बायकोला संपवलं, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Updates: मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी देणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

MU Senate Election : मुंबईचा किंग कोण? सिनेट निवडणूकीत ठाकरेंचा डंका; महायुतीच्या मुंबईतल्या आमदारांचं टेंशन वाढलं?

SCROLL FOR NEXT