Maharashtra Assembly Election  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

Girish Nikam

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवून आपला प्रभाव दाखवला होता. २०१९ मध्ये विधानसभेला वंचितला २५ लाख मतदान झालं होतं. म्हणजेच ४.६% मते मिळाली होती. मात्र नंतर वंचितला आपला प्रभाव दाखवता आला नाही. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्तीच्या स्थापनेने आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन आव्हान उभे केले आहे. कोल्हापूरचे माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकर धोंगडे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी एकत्र येऊन नव्या आघाडीची घोषणा केली आहे.

शेतकरी, असंघटित कामगार क्षेत्र, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि आदिवासींसाठी तिसरी आघाडी संघर्ष करणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआसाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. तिसऱ्या आघाडीने मोठ्या प्रमाणात मत मिळवले तर महाराष्ट्रात हरियाणासारखा निकाल महायुतीला मिळू शकेल, असं काही राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि एमव्हीए या दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. दोन्ही आघाड्यांमधील बहुतांश उमेदवारांसाठी विधानसभा निवडणूक आणखी खडतर असेल. तिसऱ्या आघाडीनं एक टक्का मते मिळवली तर त्याचा थेट परिणाम मविआच्या महत्त्वाच्या जागांवर होऊ शकतो.

आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानं तिसऱ्या आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र संभाजीराजेंनी बच्चू कडू सोबत असल्याची ग्वाही दिली आहे. महायुती आणि मविआमध्ये काँटे की टक्कर असताना तिसरी आघाडीला काही मते जाऊन राजकीय समिकरण बिघडणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज पैसा अधिक खर्चा होईल, शिवाची उपासना फलदायी ठरेल, वाचा आजचे तुमचं राशीभविष्य

Viral Video : उंदीर आहे की, वाघाचं पिल्लू...? एवढा भयंकर प्राणी तुम्ही कधी पाहिलात का?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे लढणार की नडणार? काय असेल विधानसभेसाठी रणनीती? पाहा व्हिडिओ

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

VIP Security: राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या VIP सुरक्षेतून नसणार NSG कमांडो, कोण करणार नेत्यांची सुरक्षा?

SCROLL FOR NEXT