मुंबई/पुणे

Mumbai New Airport: मुंबईत होणार तिसरं विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Sakal Sanman Program In Cm Fadnavis: वाढवण बंदरासह मुंबईला अजून एका विमानतळाची गरज आहे. तसेच बुलेट ट्रेनचा स्टॉपही तेथे होणार आहे

Bharat Jadhav

सकाळ सन्मान कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी राज्यातील उद्योगधंद्यांबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील तिसऱ्या विमानतळाबाबत मोठी घोषणा केली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. नागपूर, शिर्डी विमानतळांसह पालघरमध्येही विमानतळ केलं जाणार आहे. मुंबईला तिसरं विमानतळाची गरज आहे. वाढवण बंदरासह मुंबईला अजून एका विमानतळाची गरज आहे. तसेच बुलेट ट्रेनचा स्टॉपही तेथे होणार आहे, त्यामुळे थे मोठी इकोसिस्टिम तयार होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.

सकाळ सन्मान कार्यक्रामात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ करण्याबाबत घोषणा केली. पालघरमध्ये विमानतळ केलं जाणार असल्याने वसई, विरार, डहाणू जो परिसर आहे, हा भाग वाढणार परिसर आहे. त्यामुळे येथे तिसरं विमानतळ होणार आहे. तसेच बुलेट ट्रेनचा स्टापदेखील येथे असणार आहे, त्यामुळे येथे इकोसिस्टीम तयार होणार आहे, असल्याचं फडणवीस म्हणाले.

पालघरला होणारे विमानतळ हे वाढवण बंदरशी जोडलं जाईल. वाढवणमध्ये सगळ्यात जास्त डीपड्राप असलेली जागा आहे. म्हणजेच १० किलोमीटरच्या समुद्रात २० मीटर डीपड्राप जागा आहे. त्यामुळे देशातील सगळ्यात महत्त्वाचं बंदर कोणतं होणार असेल तर ते वाढवण असेल. याची संकल्पना १९८०च्या काळातील होती, ९२ साली याविरोधात याचिका न्यायालयात दाखल झाली. डाहणू हा भागात नैसर्गिक संपन्नता अधिक असल्यानं येथे हे बंदर केलं जाऊ नये, असं या याचिकेत म्हटलं होतं.

त्यानंतर १९९८ ला बंदर करण्याची परवानगी नाकारली गेली होती. परंतु त्यातील त्रुटी दूर करत आम्ही या बंदर उभारण्याचं काम सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले. या पोर्टमुळे गुजरातमधील बंदरच महत्त्व कमी होणार आहे. कारण वाढवण पोर्ट हा समुद्रात असेल तर गुजरातचा पोर्ट हा आत आहे, त्यामुळे अखाती देश, युरोपकडून येणाऱ्या शीपसाठी डहाणूचा पोर्ट हा जवळ असणार आहे. या बंदराचा क्षमता जेएनपीटी पोर्टपेक्षा जास्त असल्याने वाढवण पोर्टमुळे देशाचा आणि राज्याचा कायापालट होणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. याच पोर्टला जोडण्यासाठी पालघरला विमानतळ होणार असल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyanarayan Puja Niyam: सत्यनारायण पूजेला एकट्याने बसावे का?

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काळी दिवाळी

Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT