they wanted to physically injured to the pawar saheb; serious allegations by minister jitendra awhad Saam Tv
मुंबई/पुणे

...त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती; आव्हाडांचा गंभीर आरोप

Jitendra Awahd On Sharad Pawar: हल्ल्याआधी पवारांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना शरद पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर ८ एप्रिलला (शुक्रवारी) एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) हल्लाबोल करत तीव्र आंदोलन केले होते. यावेळी पवारांच्या (Sharad Pawar) घरावर काही दगडफेक करण्यात आली होती आणि चपलाही फेकण्यात आल्या होत्या. याबाबत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत आव्हाड म्हणाले की, आंदोकांचा हेतू स्वच्छ नव्हता, यात शरद पवारांना शारिरीक इजा (injured) करायची होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (they wanted to physically injured to the pawar saheb; serious allegations by minister jitendra awhad)

हे देखील पहा -

आव्हाड म्हणाले की परवा शरद पवाराच्या घरावर जो हल्ला झाला तो हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी हल्ल्याआधी पवारांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना शरद पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती. महाराष्ट्राचे नशीब आहे की,असे काही घडले नाही अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत वयाच्या ८२ व्या वर्षीही शरद पवार वन मॅन आर्मी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या गंभीर आरोपांची दखल घेतली जाईल का हे पहावं लागेल.

नागपूरात पवारांचं जंगी स्वागत -

दरम्यान शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहे त्यासाठी ते नागपूरात दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते, तसेच यावेळी कॉंग्रेस नेतेही उपस्थित होते, यावेळी राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर शरद पवार अमरावतीसाठी रवाना झाले.

सदावर्तेंना अटक -

पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी कामगारांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून काल (९ एप्रिलला) त्यांना त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी अटक केली. तसेच सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना २ दिवसांची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली आहे.

आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस -

पवारांच्या घरावरील हल्ल्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आझाद मैदानातील उर्वरित एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. सीआरपीसीच्या कलम 149 नुसार ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास एसटी कर्मचारी जबाबदार असेल आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं या नोटीसीत लिहिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

SCROLL FOR NEXT