बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही- गोपीचंद पडळकर Saam Tv
मुंबई/पुणे

बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही- गोपीचंद पडळकर

प्रस्थापितांचे बोलघेवडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : प्रस्थापितांचे बोलघेवडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी (future) निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे (MHADA) नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये, म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत होते.

पहा व्हिडिओ-

घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे (NCP) असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा (Exam) रद्द का करावी लागली आहे.यावरून सिद्ध होते, की प्रस्थापितांच्या सरकारला (government) फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक- एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणं- घेणं नाही.

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने परीक्षा सेंटरवर जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT