मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सामान्य माणसाचं भलं झालं नाही, अहंकार, अतर्क आणि असंवेदनशील हीच या सरकारची दोन वर्षे कार्यपद्धती राहिली असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शेलार म्हणाले 'पेट्रोल दर कमी झाले नाहीत मात्र विदेशी दारूची किंमत कमी झाली, ST कर्मचाऱ्यांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत, शाळांचे अनुदान दिले जात नाही, पण रयत शिक्षण संस्थेला (Rayat Shikshan Sanstha) कोट्यवधी रुपये दिले जात असल्याचा आरोपही शेलारांनी यावेळी केला.
हे देखील पहा -
तसेच या सरकारचा मूलभूत दुर्गुण अहंकार आहे. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्या पक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल असे हे अहंकारी सरकार असल्याचं वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केलं. अतिवृष्टीत 50 हजार हेक्टरी मागणी करणारे आता सरकार मध्ये आल्यावर 10 हजार हेक्टरी देण्याची घोषणा करतात. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजबिल कापले जात आहे अशी टीका त्यांनी केली.
शिवाय राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शक्ती कायदा घोषित केला जात नाही, पोलिसांचे भय राज्याला राहिले नाही. मराठा समाजाचे आरक्षण (Maratha Reservation) सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. ओबीसी राजकीय अरक्षण (OBC political reservation) सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. दलित समाज, अनुसूचित योजना लोकांपर्यत पोहचत नाही उद्योजक व्यापाऱ्यांना या राज्यात संरक्षण नाही असे घणाघाती आरोप शेलार यांनी राज्य सरकारवर केले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.