Dombivli Theft CCTV Video SAAM TV
मुंबई/पुणे

Theft Video : बियर घेण्यासाठी आला, पैसे दिले अन् मोबाईल घेवून पसार झाला, पाहा चोरीचा CCTV व्हिडिओ

Dombivli Crime News : बियर घेण्यासाठी आलेल्या तरुणाने शॉप चालकाचा मोबाईल चोरी केला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Chandrakant Jagtap

>> अभिजीत देशमुख

Dombivli Viral CCTV Video : बियर शॉपमध्ये बियर घेण्यासाठी आलेल्या तरुण दुकानदाराचा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना डोंबिवली येते घडली होती. पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली ठाकुर्ली चोळेगाव येथे एका बियर शॉपमध्ये एक तरुण बियर घेण्यासाठी आला आणि संधी साधून त्याने बिअर शॉप चालकाचा मोबाईल चोरी केला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डोंबिवली रामनगर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अवघ्या तासाभरात या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. विवेक कुमार श्याम बिहारी श्रीवास्तव असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवाशी आहे. त्याने आधी देखील अशा प्रकारे चोऱ्या केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Crime News)

दारूसाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने मारहाण

दुसऱ्या एका घटनेत दारुसाठी पैसे न दिल्याने एका रिक्षा चालकाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. या हल्ल्यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अर्जुन म्हात्रे व त्याच्या तीन साथीदाराविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Tips : सीरम लावताना 'ही' चूक करताय? ग्लोईंग स्किनसाठी जाणून घ्या खास ब्युटी टिप्स

CJP Protest : जंतर मंतरवर CJP च्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, 3KM पर्यंत नेटवर्कच नाही; आंदोलनाचा VIDEO समोर

Empty stomach: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचा मनपाचा आयुक्तांचा कार्यालयात दालनासमोर घेराव घालणार

Crime: शिर्डी हादरली! साईबाबा मंदिराच्या गेटसमोर हत्याकांड, महिलांनी चाकूने वार करत दुसऱ्या महिलेला संपवलं

SCROLL FOR NEXT