उल्हासनगरात गाऊनच्या कारखान्यात चोरी; महिलांचे दीड लाखांचे गाऊन घेऊन चोरटे पसार! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात गाऊनच्या कारखान्यात चोरी; महिलांचे दीड लाखांचे गाऊन घेऊन चोरटे पसार!

उल्हासनगरमध्ये गाऊनच्या कारखान्यात चोरी झाली असून, खिडकीचे ग्रील तोडून ५ गोण्या गाऊन घेऊन चोरटे पसार झाले आहेत. सुमारे दीड लाखांचे किंमतीचे गाऊन आहेत. चोरी करून पळताना चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

अजय दुधाणे

उल्हासनगर : गाऊनच्या कारखान्यात चोरी करून तब्बल दीड लाखांचे गाऊन चोरल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही चोरी करून पळताना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

हे देखील पहा -

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील सेक्शन ३९ च्या जयजनता कॉलनीमध्ये ओमप्रकाश गुप्ता यांचा गाऊनचा कारखाना आहे. या कारखान्यात महिलांचे गाऊन शिवण्याचं काम केलं जातं. या कारखान्यात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास खिडकीची ग्रील तोडून दोन चोरटे घुसले. त्यांनी दुकानात पाच गोण्यांमध्ये भरून ठेवलेले तयार गाऊन चोरून नेले. यात तब्बल ८०० गाऊन होते, ज्यांची किंमत जवळपास दीड लाख रुपये होती.

हे गाऊन चोरटे बाईकवर ठेवून घेऊन गेले. यावेळी हे चोरटे या परिसरातल्या सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. चोरीप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७ आणि ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अजूनही चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : संभाजीनगरात भयंकर अपघात, बापाच्या डोळ्यासमोर दोन्ही लेकरांचा मृत्यू, मुलीला पाहून धाय मोकलून रडले

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Lonavala Mega Block: मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील १० दिवस मेगा ब्लॉक; VIDEO

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

SCROLL FOR NEXT