Pune दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

आळंदीतील केळगावमधील घटना; लग्न जुळत नसल्यानं तरुण टॉवरवर चढला...(पहा Video)

लग्न जुळत नसल्याने टॉवरवर तरुण चढल्याची घटना आळंदीत परिसरात घडली

दिलीप कांबळे

पुणे: लग्न जुळत नसल्याने हायटेन्शन टॉवरवर मद्यपी तरुण चढल्याची घटना आळंदीत परिसरात घडली आहे. तब्बल १० तासांनी त्याला खाली उतरविण्यात आळंदी पोलीस, अग्निशमन दलाला यश आले आहे. किशोर दगडोबा पैठणे (वय-30) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना आळंदीतील (Alandi) केळगाव येथे घडली आहे. लहान मुलाच लग्न (married) जुळले असून मोठा मुलगा म्हणजेच किशोर मद्यपान करतो, बऱ्याचदा तो घरी येत नसल्याने त्याचा विवाह जुळत नाही, असे त्याच्या आईने पोलिसांना (police) सांगितले आहे.

पहा व्हिडिओ-

तब्बल १० तास या घटनेचे थरारनाट्य सुरू होते. किशोर का मानसिक तणावात आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दीडशे फूट उंच टॉवरवर या दारूड्याचे १० तासांचा ड्रामा सुरु होता. दारूच्या नशेत तरुण महावितरणच्या दीडशे फूट उंच टॉवरवर चढला होता. आळंदी पोलीस, महावितरण आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर तब्बल दहा तासांनी त्याची सुखरुप सुटका केली. ही घटना आळंदी जवळील केळगाव मध्ये घडली.

किशोर पैठणे,असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. महावितरणच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला. आळंदी खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्या तरुणाला वारंवार विनंती केल्यावरही तो खाली उतरत नव्हता. अखेर आज सकाळी पिंपरी चिंचवड च्या अग्निशमन दलाचे जवान तिथं पोहचले आणि त्याला खाली काढले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली; डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

SCROLL FOR NEXT