मुंबई/पुणे

Mumbai : लिफ्टच्या दारातून कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी अंत

एका संकुलात चौथ्या मजल्यावर खेळणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई मधील Mumbai शीव- पूर्व परिसरामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या ठिकाणी एका संकुलात चौथ्या मजल्यावर खेळणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोसायटीतील चौथ्या मजल्यावर लपा-छपी खेळत असताना ७ वर्षीय चिमुकली बंद पडलेल्या लिफ्टमध्ये लपण्याकरिता गेली. पण संबंधित लिफ्टचे दार अचानक उघडल्याने चिमुकली कायमची आई- वडिलांच्या नजरेआड झाली आहे.

चौथ्या मजल्यावरून कोसळून तिचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दिया सिद्धी विनायगम असे मृत पावलेल्या ७ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ती मुंबईतील शीव पूर्व या ठिकाणी मासळी बाजार जवळील ओम शिवशाही सोसायटी मधील रहिवासी आहे. या सोसायटीला २ लिफ्ट आहेत. पण त्यात एक लिफ्ट मागील २ वर्षांपासून बंद पडली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, मृत दिया ही आपल्या काही चिमुकल्या मित्र- मैत्रिणीबरोरब लपा-छपी खेळत होती.लपा-छपी खेळत असताना मृत दिया ओम शिवाशाही सोसायटी मधील लिफ्टच्या दाराजवळ लपण्याकरिता गेली होती. यावेळी अचानक लिफ्टचे दार उघडले गेले आणि ती थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली आहे. तिच्याबरोरब खेळणाऱ्या अन्य मुलांनी तातडीने या घटनेची माहिती दियाच्या कुटुंबीयांना दिली होती.

कुटुंबीयांनी तातडीने तळमजल्यावर धाव घेऊन, शेजाऱ्यांच्या मदतीने बंद पडलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडला असता, याठिकाणी ७ वर्षीय चिमुकली जखमी अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने तिला जवळच्या टिळक रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. पण याठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी करून उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले आहे.

ऐन दिवाळी सणाच्या काळात चिमुकलीचा अशापद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शीव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: स्वस्तात मस्त! फक्त 189 रुपयांत 28 दिवसांची टेन्शन संपली, Jio चा धमाकेदार प्लान काय?

Salman Khan: 'तेरे नाम २.०...';' सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे

Maharashtra News Live Update: ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल

Success story: चौथीनंतर शाळा सुटली अन् ट्रकवर क्लिनर बनला; एका व्हिडीओमुळे १० वी पास झालेल्या अरुण कुमारची थक्क करणारी कहाणी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची धाकधूक वाढली! मातोश्रीवरील बैठकीआधीच 'हा' खासदार 'नॉट रिचेबल'

SCROLL FOR NEXT