मावळमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ उत्साहात संपन्न दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मावळमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ उत्साहात संपन्न

मावळमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ उत्साहात संपन्न झाला आहे. लहान मुलींपासुन ते वृध्द महिलेपर्यंत सर्व महिला यात सहभागी होतात.

दिलीप कांबळे

पुणे : मावळ मध्ये गौरी विसर्जन झाल्यानंतर सर्व गांवामध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरम्यान गावातील लहान मुलींपासुन ते वृध्द महिलेपर्यंत सर्व महिला आनंदाने सहभागी सहभागी होत असतात. (The traditional game of asking for daughter's in Maval thrives)

हे देखील पहा -

तसेच नागपंचमी व गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशीन महिला यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. या विवाह सोहळ्यात एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविले जाते आणि त्या मुलाकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो. पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात काढली जाते. त्यामध्ये महिला मनसोक्त नाचतात गातात. ही वरात तास दीड तास चालते. त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा होतो.

दरम्यान जमलेल्या सर्व मंडळींना भोजनही दिले जाते या सोहळ्यामद्ये अनेक महिला रोजच्या संसारातील सुख-दुःखे विसरून सहभागी होतात त्यांना गावतील पुरूष मंडळीही मदत करतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT