Covid Booster Dose Saam TV
मुंबई/पुणे

Covid Booster Dose: आजपासून मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोस, तुम्ही पात्र आहात का?

मुंबईत आजपासून Covid Booster Dose मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधी ग्रस्त नागरिकांना लस मिळणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशात आजपासून कोरोना लसीचा तिसरा डोस (Covid Booster Shot) द्यायला सुरुवात होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) तसेच स्टँडिंग टेक्निकल सायन्टीफीक कमिटी (STSC) यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण (Vaccination) सुरू होणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी (Online Registration) तसेच थेट येवून नोंदणी (Onsite / Walk-in Registration) पद्धतीने ह्या दोन्ही सुविधा उपलब्ध असतील. (Covid Booster Dose Started in Mumbai)

हे देखील पहा -

कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर (फ्रंटलाईन) काम करणारे कर्मचारी, तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक ह्यांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस (Covid Booster Dose) घेण्यासाठी ते पात्र असतील. ६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किवा दाखवण्याची आवश्यकता नाही. मात्र, अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल. मात्र ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किंमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन ऍपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी 'नागरिक' अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येवून (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र / ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थ्यांना खासगी केंद्रात घ्यावयाची असेल तर, त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची त्यांना मुभा असेल.

दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, हा निकष लक्षात घेवून प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. तसेच, संबंधित लाभार्थ्यांनी जर आधी कोविशील्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशील्ड लसीची मात्रा देण्यात येईल. ज्यांनी आधी कोवॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोवॅक्सिन लसीची मात्रा देण्यात येईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT