‘बेस्ट CM’च्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याचा निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला  Saam Tv News
मुंबई/पुणे

Politics|‘बेस्ट CM’च्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याचा निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला

‘बेस्ट CM’ च्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला - आ.अतुल भातखळकर यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी २४ टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१ या वर्षी तब्बल ४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोविडच्या काळातही संपूर्ण देशांची निर्यात वाढत असताना महाराष्ट्राचा वाटा कमी होणे हे दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा व राज्यातील उद्योग विरोधी वातावरणाचा ढळढळीत पुरावा आहे; अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर नीती आयोगाकडून जाहीर केलेल्या एक्सपोर्ट प्रीपेडनेस इंडेक्समध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

हे देखील पहा :

राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे या करिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या एक जिल्हा एक उत्पादनातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे, राज्यातील धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, गडचिरोली व हिंगोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात नाहीत, हेही दिसून आले आहे.

देशातील अनेक राज्यांनी या योजनेसाठी विशेष यंत्रणा व वेबसाईट सुरु केलेली असताना ठाकरे सरकार या विषयात सुस्त बसले आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्याचे जीएसटी संकलन ३७२८ कोटी रुपयांनी कमी झाले असताना आणि टेस्ला सारख्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या असतानाच आता निर्यातीत सुद्धा महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची आकडेवारी समोर येणे हि राज्यासाठी चिंतेची बाब आहे. किमान आता तरी उद्योग विभागाने ‘भूषणावह उद्योग’ सोडून या क्षेत्राच्या वाढीसाठी उपाययोजना कराव्या असे सुद्धा आ.भातखळकर म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT