Breaking : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!
Breaking : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!SaamTvNews

Crime : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!

हत्या झालेल्या युवकाचा साखरपुडा होता आणि साखरपुड्याच्याच दिवशी त्याच्या प्रेयसीने त्याचा घात केला आहे. प्रियकराचे लग्न ठरल्यामुळे नाराज होऊन या महिलेने आपला भाऊ आणि त्याच्या दोन्ही मित्रांच्या मदतीने संबंधित युवकाची गळा चिरून हत्या केली आहे.
Published on

नवी दिल्ली - प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात उघडकीस आली आहे. प्रेमात धोका मिळाल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियकराचे लग्न ठरल्यामुळे नाराज होऊन या महिलेने आपला भाऊ आणि त्याच्या दोन्ही मित्रांच्या मदतीने संबंधित युवकाची गळा चिरून हत्या केली आहे. हत्या झालेल्या युवकाचा साखरपुडा होता आणि साखरपुड्याच्याच दिवशी त्याच्या प्रेयसीने त्याचा घात केला आहे. हत्या करून आरोपींनी त्या युवकाचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. मात्र, हा मृतदेह तरंगत बाहेर आल्यामुले हे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेस अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हे देखील पहा :

प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड मधील सांगीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावचा रहिवासी असणाऱ्या राजेंद्र वर्मा या युवकाचे मागील काही दिवसांपासून रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते. मात्र, काही दिवसांपूर्वी राजेंद्रचा विवाह ठरला होता. तसेच त्याचा साखरपुडाही संपन्न होणार होता. परंतू, आपल्या प्रियकराचे लग्न होत आहे हे समजल्यावर सोना देवी राजेंद्रवर अत्यंत नाराज आणि उद्विग्न झाली होती. राजेंद्रकडुन अश्याप्रकारे प्रेमात धोका मिळाल्यामुळे तिने आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या साहाय्याने राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.

Breaking : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Breaking : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

लग्नाची आणि साखपुड्याची तयारी करण्याकरता राजेंद्र आपल्या घरी निघाला होता. प्रेयसी सोना देवीने त्याला लग्नापूर्वी भेट घे म्हणत भेटण्यासाठी बोलावले. हत्येपूर्वी आरोपींनी राजेंद्र याला लखनऊ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवले. सोना देवीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन साथीदार या गाडीत आधीपासूनच बसून होते. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर प्रेयसी सोना देवी, तिचा भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रचा गळा चिरून खून केला.

प्रेमात धोका मिळाल्याने घेतला टोकाचा निर्णय!

आरोपींनी हत्येनंतर राजेंद्रचा मृतदेह एका नाल्यात टाकला आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्रचा मृतदेह नाल्यात तरंगताना आढळून आला. सदर प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला असता त्यांना सोना देवीबाबत माहिती मिळाली. त्यावेळी पॉलिसी खाक्या दाखवताच तिने प्रेमात धोका मिळाल्यामुळे आपणच राजेंद्रची हत्या केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सोनदेवीला आणि तिच्या साथीदारांना देखील अटक केली आहे. प्रेमात धोका मिळाल्यामुळे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com