MVA Goverment Saam TV
मुंबई/पुणे

आमदारांची नाराजी नको म्हणून राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांदरम्यान, सरकारला आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील प्रशासकीय बदल्यांबाबत काढलेला निर्णय मागे घेतला आहे. या प्रशासकीय बदल्या आता ३० जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत. राज्यातील प्रशासकीय बदल्या मे महिन्यात करा, असा आदेश सरकारने मागील आठवड्यात काढला होता. पण, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या एक महिना पुढे ढकलण्याचा राजकीय निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

हे देखील पाहा -

सरकारला राज्यातील आमदारांची नाराजी ओढावून घ्यायची नसल्यामुळे या बदल्या पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे. कारण, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून, या दोन्ही निवडणुकांमध्ये आमदारांच्या मतांना महत्व असतं शिवाय आमदारांना आपआपल्या मतदार संघात, जिल्ह्यांमध्ये अपेक्षित बदल्या हव्या असतात, त्यासाठी त्यांनी निवेदनं देखील दिलेली असतात. मात्र, या बदल्यांमध्ये सरसकट सर्वांना खुश करणे शक्य नसल्यामुळे सरकारने सावध भूमीका घेत हा धोरणात्मक निर्णय घेत या बदल्या आता ३० जून पर्यंत करु नये असा निर्णय घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT