पुणे - पुण्यातील बाजार समितीमध्ये रत्नागिरीचा हापूस हा कर्नाटक आंबा म्हणून जप्त करण्याचा प्रकार गुलटेकडी मार्केट यार्डा परिसरात घडला आहे. अजब म्हणजे हा आंबा कोणत्या जातीचा तपासण्यासाठी कोणताही अनुभव नसणाऱ्या एका परप्रांतीयाला बोलावण्यात आले. तर शेतकऱ्याने विनवणी करूनही बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना दमदाटी केली आहे.
हे देखील पाहा-
सोमवारी शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून हापूस आंब्याच्या शंभर पेट्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु हा आंबा रत्नागिरीचा हापूस नसून कर्नाटक आंबा असल्याचे म्हणत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्या.
शेतकऱ्याने सातत्याने विनवणी करूनही त्यास प्रतिसाद न देता उलट शेतकऱ्यालाच दमदाटी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीकडून चोर सोडून संन्याशाला फाशी असाच काहीसा प्रकार घडला आहे. यापूर्वी देखील कर्नाटक हापूस आंबा हा रत्नागिरीचा हापूस दाखवून फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने कडक पावलं उचलायला सुरवातही केली आहे. मात्र या प्रकारामुळे खऱ्या शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागला.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.