Mumbai BDD Chawl Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai BDD Chawl: मुंबईतील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ आज होणार...

आज दुपारी २ वाजता '५ ब' ही पहिली इमारत तोडण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नायगावं येथे उपस्थित असणार आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज बीडीडीवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. बीबीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यात येणार आहे. आज दुपारी २ वाजता '५ ब' ही पहिली इमारत तोडण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणावेळी स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) नायगावं येथे उपस्थित असणार आहेत. इंग्रजांचे कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवला आहे. या इमारतींना १०० वर्ष होत आली होती. (Historic Day: The redevelopment of BBD Chawl in Mumbai will start today)

हे देखील पहा -

सध्या नायगावात या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. १९९५ च्या युती सरकारच्या काळापासून या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या या कामाला सुरुवात होत आहे. तर दुसरीकडे वरळी बीडीडी (BBD Chawl Latest News) मधील रहिवशांना निष्काशनाबाबत नोटीस आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे बीडीडी पुनर्वसन बाबत दोन वेगळ्या भूमिका समोर येत आहे.

बिडीडी वसाहतींचा पुनर्विकास ऐतिहासिक गोष्ट आहे. आज नायगाव बीडीडी चाळीतील पहिली इमारत निष्काशीत होणार आहे याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं की, "मंगळवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी मुंबईच्या इतिहासातील एक नवीन टप्पा पार पाडला जाईल. बीडीडी वसाहतीचा पुनर्विकास हा ऐतिहासिक आहे. उद्या (मंगळवारी) दुपारी 2 वाजता नायगावमधील पहिली बिल्डिंग निष्कासित करण्यात येणार आहे. तो मुंबईच्या (Mumbai) इतिहासातील सुवर्णक्षण असेल.

शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत ट्विट केलं की, "काही दिवसांपासून बीडीडी चाळीतील रहिवाशांना सार्वजनिक बांधकाम विभाग, सक्षम प्राधिकरण मार्फत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत, त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात आज बीडीडी चाळ संचालक यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावाकरून रहिवाशांना दिलासा देण्याबाबत आश्वासित केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

SCROLL FOR NEXT