आरोग्य विभागाचा गट "क' चा पेपरही फुटलेलाच.. प्रश्नपत्रीका घेणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांकडून अटक ! SaamTV
मुंबई/पुणे

आरोग्य विभागाचा गट 'क' चा पेपरही फुटलेलाच; प्रश्‍नपत्रिका घेणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांकडून अटक

गट "ड' पाठोपाठ गट "क'चीही प्रश्‍नपत्रिका फुटल्याची माहिती पुढे आली. शिवाय दोन्ही प्रश्‍नपत्रिका फोडण्याचा प्रकार परीक्षेच्या दिवशी नव्हे, तर तब्बल एक महिना आगोदरच केल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : आरोग्य विभागाच्या गट "ड' प्रमाणेच गट "क'च्या परीक्षेचीही प्रश्‍नपत्रिका फुटल्याची माहिती या प्रकरणातील मुख्य आरोपीने सायबर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून दोन्ही गटांच्या प्रश्‍नपत्रिका फुटीच्या तपासावर भर दिला आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी शुक्रवारी फुटलेली प्रश्नपत्रीका घेणाऱ्या 2 उमेदवारांना बीड व उस्मानाबादमधील (Beed and Osmanabad) उमरगा येथून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 14 वर पोचली आहे.

हे देखील पहा -

नामदेव विक्रम करांडे (वय 23, अष्टविनायक कॉलनी, कॅनॉल रोड, गयानगर, बीड) व उमेश वसंत मोहीते (वय 24, रा. कोताळ, बलसूर,उमरगा, उस्मानाबाद ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त (Cyber ​​Crime Branch Deputy Commissioner) भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या गट "ड'च्या 31 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या परीक्षेच्यावेळी प्रश्‍नपत्रिका फुटली होती. याप्रकरणी आरोग्य विभागाकडून स्मिता कारेगावकर यांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून विविध ठिकाणाहून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीला 4 जणांना अटक केल्यानंतर सायबर पोलिसांनी लातुरच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यास अटक केली. त्याच्या चौकाशीतुन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश बोटले (Mahesh Botale) याचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये पैसे देऊन प्रश्‍नपत्रिका घेणाऱ्या करांडे व मोहिते या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त भाग्यश्री निवटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अनिल पुंडलीक, अश्विन कुमकर, सुनिल सोनोने यांनी केली.

प्रश्‍नपत्रिका फुटीचा मास्टरमाईंड' बोटलेच -

बोटले व बडगिरे हे दोघेच या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासावरुन निष्पन्न झाले आहे. बोटले हा आरोग्य विभागातील (Department of Health) गट "क' व गट "ड' या पदाच्या भरतीसाठी असलेल्या लेखी परिक्षा पेपर समितीचा सदस्य आहेत. त्यास पेपरबाबत महत्वाचे अधिकार दिले होते. त्यातूनच त्याने त्याच्याकडील दोन्ही पेपर एका पेन ड्राईव्हमध्ये बडगिरेला दिले. बडगिरे याने पुढे 20 जणांना पेपर देऊन एक कोटी रुपये घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार बडगिरेने नामदेव करांडेकडून 8 लाख रुपये तर उमेश मोहितेशी 5 लाख रुपये ठरवून प्रत्यक्षात दोन लाख रुपये घेतले त्यांना प्रश्‍नपत्रिका दिल्याचे बडगिरेने पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिनाभरापुर्वीच प्रश्‍नपत्रिकेला फुटले पाय -

आरोग्य विभागाच्या गट "क' व "ड' ची परीक्षा 24 सप्टेंबर होणार होती. मात्र प्रवेशपत्रिका, परीक्षा केंद्र व तांत्रिक गोंधळामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 23 सप्टेंबर रोजी परीक्षा पुढे ढकलल्याचे घोषीत केले. त्यानुसार, 24 ऑक्‍टोबरला गट "क'ची तर 31 ऑक्‍टोबरला गट "ड'ची परीक्षा झाली. उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतर सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) तपास करून आरोपींना अटक केली. या प्रकरणामध्ये बोटले, बडगिरे यांनाही अटक झाली. त्यातुनच गट "ड' पाठोपाठ गट "क'चीही प्रश्‍नपत्रिका फुटल्याची माहिती पुढे आली. विशेषतः बोटले याने दोन्ही प्रश्‍नपत्रिका फोडण्याचा प्रकार परीक्षेच्या दिवशी नव्हे, तर तब्बल एक महिना आगोदरच केल्याची माहिती आता पुढे आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT