हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का? Saam Tv
मुंबई/पुणे

हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का?

आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2021) सुरू आहे. संपूर्ण अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) उपस्थिती आजिबात दिसली नाही. पण, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Election) होण्याची शक्यता आहे. यामुळे आज मुख्यमंत्री विधानभवनात येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा सभेला उपस्थिती दर्शवली नव्हती. मुख्यमंत्री राज्यात फिरत नाही, असा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये (convention) देखील उपस्थित नव्हते. यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली जात होती.

हे देखील पहा-

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) तसा सल्ला दिला होता. त्यानंतर राजकीय (Political) वातावरण चांगलच तापल्याचे बघायला मिळाले होते. तसेच मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये कधी येणार? असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली असून ते त्यांच्यावेळी विधानभवनात हजेरी लावणार, असे आदित्य ठाकरेनीं यावेळी सांगितले होते. त्यानंतर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहतात की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला, तर प्रथेप्रमाणे अध्यक्षांना विराजमान करण्याकरिता मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्वाची असते. आज अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. अद्याप याविषयी कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून, आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.

एकीकडे राज्यपालांनी (Governor) ठाकरे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता नियमात केलेले बदल यावर आक्षेप घेतला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. राज्यपालांकडून सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये निवडणूक घेण्याविषयी सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार विधानसभा सभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यावर ठाम असून, सोमवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक विधान भवनातील समिती कक्षात पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई तसेच इतर मंत्री, मुख्य सचिव आणि सचिव देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणारच अशी भूमिका सरकारने घेतली आहे. जर ही निवडणूक झाली तर मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणे महत्वाचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT