jitendra Awhad News Saam TV
मुंबई/पुणे

'The Kerala Story'ची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर Jitendra Awhad संतापले, म्हणाले, ज्यांच्या DNA मध्ये...

Latest News: भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आव्हाडांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Priya More

Mumbai News: 'द केरल स्टोरी' या चित्रपटाविषयी (The Kerala Story Movie) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात (Vartak Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आव्हाडांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्वीट करत 'ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार', अशी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या.' असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याने वर्तकनगर पोलिस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप या भाजपच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत चांगलाच समाचार घेतला आहे.

आव्हाडांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की, द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ, राज्य, राष्ट्र नसते. हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला.'

आव्हाडांनी पुढे असे म्हटले आहे की, 'नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आता मात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे.', अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT