Maharashtra Political Hearing In SC
Maharashtra Political Hearing In SC Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Hearing: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुढे ढकलण्यात आली आहे. आता २९ नोव्हेंबरला ही सुनावणी (Hearing In Supreme Court) होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि १६ आमदारांची अपात्रता अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती.  या घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. (Maharashtra political Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षकारांना कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांना एकत्र बसून चर्चा करण्याचे तसेच दोन्ही बाजू लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई ही निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत 'खरी शिवसेना कोणाची', याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटलं होतं.

पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टातच फैसला होणार आहे. आज सुनावणी थोडक्यात आवरली असून 29 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT