Electricity Saam TV
मुंबई/पुणे

ऐन उन्हाळ्यात अदानी कंपनीने केली बत्ती गुल; साडेतीन हजार घरं अंधारात

२००५ पासून येथील साडेतीन हजार कुटुंबीयांनी वीज बील भरले नाही. त्यामुळे हे वीजबील कोटींच्या घरात पोहचली आहेत.

जयश्री मोरे

मुंबई : थकीत वीजदेयक न भरल्याने पुन्हा एकदा अदानी वीज कंपनीने (Adani Power Company) चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील साडेतीन हजार घरांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. परिणामी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या सर्व रहिवाशांना शुक्रवारचा पूर्ण दिवस घराबाहेरच बसून घालवावा लागला आहे. चेंबूरमधील (Chembur) पूर्व द्रुतगती मार्ग आणि शीव पनवेल महामार्गाच्या मध्यभागी ही सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये साडेतीन हजार घरं आहेत.

२००५ मध्ये एका विकासकाने याठिकाणी एसआरए अंतर्गत इमारती उभ्या करून झोपडीतून सर्वांना इमारतीमध्ये घरे देण्याचे आमिष दाखवले. त्याच वेळी सर्व रहिवाशांचे वीजदेयक देखील भरणार असल्याचे आश्वासन विकासकाने दिले होते. त्यामुळे २००५ पासून येथील साडेतीन हजार कुटुंबीयांनी वीज बील भरले नाही. त्यामुळे हे वीजबील (Electricity Bill) कोटींच्या घरात पोहचल्यानंतर २०१७ आणि २०१९ ला या सर्व रहिवाशांची वीज बंद करण्यात आली होती. मात्र काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मात्र दोन महिन्या आधी ही वीज कापल्यामुळे रहिवाश्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चा देखील काढला होता तेव्हा २०१९ पासूनचे बिल भरण्यास सांगितले होते.

हे देखील पाहा -

यातील काही घरे सोडल्यास अनेक नागरिक नियमित वीज देयक भरत आहेत. मात्र सध्या ही थकबाकी १०२ कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कापून टाकली. मात्र पुन्हा रात्री हे ग्राहक (Customer) चोरून वीज घेत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी पुन्हा जोडणी कापण्यास सुरुवात केली.

मात्र काही रहिवाशांकडून अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे कंपनीने शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच साडेतीन हजार घरांची वीज खंडित केली आहे. जो पर्यंत थकीत देयक भरणार नाही तो पर्यंत वीज सुरू करणार नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर ज्यांचे ५०-६० हजार आहे त्यांना हप्ते बांधून द्यावे अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT