Marathi Sign Board Vs Adv. Gunratna Sadavarte
Marathi Sign Board Vs Adv. Gunratna Sadavarte Saam Tv
मुंबई/पुणे

Marathi Sign Board: "मराठी पाट्यांचा निर्णय बालहट्टासारखा"- अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

सूरज सावंत

मुंबई: मराठी पाट्यांचा मुद्दा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी पाट्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासंदर्भात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून आक्षेपही व्यक्त केला आहे.

हे देखील पहा -

आपल्या पत्रात सदावर्ते म्हणाले की, "शासनाचा दिनांक १२/०१/२०२२ मंत्रिमंडळ निर्णय मंत्रिमंडळ निर्णय दिनांक १२/०१/२०२२ व्यापारी आस्थापनांवरील (दुकानांवरील) नामफलकावर मराठी भाषेचा (Marathi Language) फॉन्ट हा नामफलकावरील इतर भाषे एवढाच असावा हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल १९ चा भंग आहे. तसेच ट्रेडमार्क अँड लोगोच्या अधिकारावरसुद्धा गदा आणणारा आहे. सदर निर्णय घेण्यापूर्वी मंत्रिमंडळाने किंवा महाराष्ट्र शासनाने सर्व सामान्यांची मते मागविणे अभिप्रेत होते. परंतु कोणतीही मते न मागविता तसेच व्यापारी आस्थापनावर दुरोगामी परिणाम होईल याचा विचार न करता आणि बॉम्बे शहर हे वैश्विक व्यापाराचे केंद्र आहे याचा विसर पडल्याने केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याकरिता आणि राजकीय अभिलाषा पूर्ण करण्याकरिता हा चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारचा निर्णय हा "बालहट्टासारखा" आहे! त्याचे कारण म्हणजे मराठी लिपीतील दुकानांवरील नामफलक असावा असे म्हटले आहे. अन्यथा इतर भाषेत जी फॉन्ट साईझ असेल त्याच फॉन्ट साईझचा मराठीतही नाव असावे असे म्हटले आहे. सरकारने ट्रेडमार्क लोगो सारख्या बाबींना अनदेखी केली आहे, तेव्हा आपणांस या निवेदन/ कायदेशीर नोटीसद्वारे विनंती करण्यात येते. राज्य सरकारचा मराठी भाषेतील दुकानांवरील पाट्यांचा फॉन्ट साईझ बाबतचा निर्णय आपण अमान्य करावा आणि त्या बाबतचे नोटिफिकेशन थांबवावे" असं सदावर्तेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT