mumbai slum yandex
मुंबई/पुणे

Land Occupied By Slums In Mumbai : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घट, अशी आहे अभ्यासात समोर आलेली आकडेवारी

Land Occupied By Slums In Mumbai : मुंबईतील झोपडपट्टीच्या बाबतीत एक नवीन आकडेवारी समोर आली आहे. जाणून घेऊया या आकडेवारीमध्ये कित्ती टक्क्यांनी घट झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : (land occupied by slums in Mumbai) जगभरात मुंबई अनेक करणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी हे देखील एक कारण आहे. मुंबईतील झोपडपट्टीच्या बाबतीत एक नवीन आकडेवारी समोर आली आहे.  2005 ते 2022 या कालावधीत मुंबई प्रदेशातील झोपडपट्ट्यांमध्ये 8.6 टक्के घट झाली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास 4.1 चौरस किमीची घट झाली आहे. हे क्षेत्र महालक्ष्मी रेसकोर्सच्या अंदाजे 4.5 पट आहे.

अभ्यासात नेमके काय समोर आले?

अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील झोपडपट्ट्यांनी व्यापलेले क्षेत्र हे बृहन्मुंबई आणि ठाणे शहर  2005 मधील 47.7 चौरस किमीवरून 2022 मध्ये 43.6 चौरस किमीवर घसरले आहे. झोपडपट्ट्यांच्या बाबतीत मुंबईत मोठे बदल झाल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. मुंबईच्या झोपटपट्टीताल काही भाग आधीपेक्षा मोठे झाले तर काही भाग लहान झाले आहे. याशिवाय काही भाग दोन दशकात गायब झाल्याचेहा निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी झोपडपट्ट्या एकूण 10.2 चौरस किमीने कमी झाल्या आहेत आणि काही ठिकाणी 6.1 चौरस किमीने वाढल्या देखील आहेत.

संशोधक जॉन फ्रिसन यांनी केलेल्या अभ्यासात 2010 नंतर मुंबईच्या झोपडपट्ट्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पहिल्या दशकात झोपडपट्ट्या वाढल्या तर दुसऱ्या दशकात त्यांची घनता वाढली असल्याची सांगण्यात आले. या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की झोपडपट्ट्यांकडे अनियंत्रित शहरी विस्ताराचे क्षेत्र म्हणून पाहिले जाऊ नये कारण ज्यांचे सतत विघटन आणि पुनर्बांधणी होत आहे, असे शंशोधकांचे मत आहे.

मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या अभ्यासासाठी संशोधक जॉन फ्रिसन आणि त्यांच्या चमुने 2005 आणि 2022 दरम्यान मुंबई प्रदेशातील झोपडपट्टीने व्यापलेल्या जमिनीतील बदलांचा नकाशा तयार करण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा आणि इतर डेटाचा वापर केला.

एकूण जमिनीचे क्षेत्रफळ जवळपास 600 चौरस किमी (नॅशनल पार्कसह) व्यापले असून, मुंबई प्रदेशातील झोपडपट्ट्यांनी व्यापलेल्या जमिनीचे प्रमाण 2005 मधील 8 टक्क्यांवरून  2022 मध्ये 7.3 टक्क्यांपर्यंत खाली आले. दरम्यान, नवी मुंबई आणि मुंब्य्राच्या काही भागांसह मुख्य भूभागावर झोपडपट्टीचे क्षेत्र जवळपास 35 टक्के वाढले. तसेच 2005-2022 दरम्यान हे 12 चौरस किमीवरून 16.1 चौरस किमीपर्यंत वाढले.

या अभ्यासात संशोधकांनी झोपडपट्ट्यांची अवकाशीय घनता देखील लक्षात घेतली आहे, जी त्यांनी संरचनांमधील अंतरावर आधारित केली. ज्या झोपडपट्ट्यांमध्ये संरचनांमध्ये 10 मीटरपेक्षा कमी अंतर आहे त्यांना उच्च घनता म्हणून वर्गीकृत करण्यात आले, तर 30 मीटरपर्यंतचे अंतर कमी घनता म्हणून वर्गीकृत करण्यात आले. संपूर्ण प्रदेशात, संशोधकांना आढळले की कमी घनतेच्या झोपडपट्ट्यांची संख्या 2005 ते 2010 दरम्यान 294 वरून 502 पर्यंत दुप्पट झाली, 2022 पर्यंत 266 पर्यंत खाली घसरली.

या घसरणीचा आणखी अभ्यास करणे आवश्यक आहे. 100 मीटर बफर झोनचा 200 मीटरपर्यंत विस्तार केल्यास परिणाम भिन्न असू शकतात. जलकुंभ आणि रेल्वेजवळ 100 मीटरच्या पुढे झोपडपट्टीचे क्षेत्र वाढले आहे. असे अभ्यासक फ्रिसेन यांचे मत आहे. 

Edited By - नितीश गाडगे

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT