Vasant More Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: वसंत मोरे यांना सेनेत घेण्यास खुद्द उद्धव ठाकरेच उत्सुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना फोन करुन त्यांनी शिवसेनेत येण्याबाबत फेरविचार करावा असं सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना फोन करुन त्यांनी शिवसेनेत येण्याबाबत फेरविचार करावा अशी ऑफर दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना या पदावरुन हटवल्यानंतर मोरे यांनी आपल्या पक्षात येण्याच्या इतर पक्षांनी ऑफर दिल्या होत्या.

'वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Pune) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. मात्र, खुद्द वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. तसंच माझी या पदावरुन हकालपट्टी केली नसून माझ्या या पदाचा कार्यकाळ संपल्याने ही जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली असल्याचं मोरेंनी सांगितंल आहे.

मात्र, आता येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मोरे नाराज असून ते आपल्या पक्षात येतील का? यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरेंना शिवसेनेमध्ये येण्याबाबत पुनर्विचार करावा असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

SCROLL FOR NEXT