Dombivali Illegal Construction प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivali: ज्या खड्ड्यानं चिमुकल्याचा जीव घेतला ती इमारतच निघाली अनधिकृत; पालिका प्रशासन मात्र ढिम्म...

Dombivali Illegal Construction: अनधिकृत इमारत उभी राहत असताना पालिकेचे अधिकारी झोपले होते का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टच्या (Lift) खड्ड्यात पडून १० वर्षीय सत्यम मौर्य याचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (19 जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील (Dombivali) सांगाव परिसरात घडली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर हा मुलगा राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान ती इमारत अनधिकृत (Illegal Construction) असल्याचे उघड झाले आहे. बेकायदा असलेल्या या इमारतीवर येत्या दोन दिवसांनी अर्थात शुक्रवारी, २१ जानेवारी रोजी हातोडा हाणला जाणार आहे. तसेच मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कथित बिल्डरच्या विरोधात फौजदारी कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही अनधिकृत इमारत उभी राहत असताना प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पालिकेचे (KDMC) इतर अधिकारी झोपले होते का? असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. (The building's lift pit that took the life of a kid was unauthorized; Palika administration useless ...)

हे देखील पहा -

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला सांगाव परिसरात एका दुकानात काम करणारे राजकुमार मोर्या यांचा मुलगा सत्यम मंगळवारी सांयकाळी खेळायला गेला. ३ तासांनंतर त्याचा मृतदेह त्याच परिसरात एका ८ मजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात सापडला. या इमारतीच्या लिफ्टकरिता (Lift) तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी भरले होते. त्याच पाण्यात बुडून सत्यमने दम तोडला. सत्यमच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यांनादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान पालिकेने सदर इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. या इमारती संदर्भात वेळोवेळी संबंधित बिल्डरला नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

येत्या शुक्रवारी ही इमारत भुईसपाट करण्यात येणार असल्याचे केडीएमसीचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी पत्रकारांना सांगितले, तर सत्यमच्या मृत्यूला जबाबदार धरत मानपाडा पोलिसांनी बिल्डर विरोधात फौजदारी कारवाई केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. दरम्यान ही इमारत तोडली जाणार असली तरी ती उभी होता असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना कसे समजले नाही? तसेच प्रभाग क्षेत्र अधिकारी इमारत उभी करत असताना कारवाई का केली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT