Sanjay Raut vs BJP LIVE Updates: देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात सर्वात मोठा घोटाळा- संजय राऊत Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut vs BJP LIVE Updates: देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात सर्वात मोठा घोटाळा- संजय राऊत

सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे- तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. राऊत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन- आशिष शेलार- चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढत आहे. त्याचवेळी संजय राऊत हे शिवसेनेत एकटे पडतायत का असाही सवाल विचारला जात होता. त्यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचं संकट आहे. असंच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.

मला कुणीतरी सांगितले की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथे गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळले पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडे सुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय. तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त ५ वर्षात दुधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा?

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT