बॅटरीवर चालणार मास्क ! सुरज सावंत
मुंबई/पुणे

बॅटरीवर चालणारा मास्क करणार कोरोनाचा खात्मा!

या मास्कमुळे कोरोना नष्ट होईल असा दावा सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई - नरसी मोनजी विद्यापीठाच्या सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सने School Of Science एक नवा शोध लावला आहे. या शोधामुळे कोरोना नष्ट होईल असा दावा सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सने केला आहे. या शोधात त्यांनी एक अनोखा मास्क Mask बनवला आहे. मास्कवर कोरोना Corona अथवा म्युकर मायकोसिसचा mucormycosis विषाणू आल्यास तो तात्काळ नष्ट होईल असे सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सकडून सांगण्यात आले आहे. या मास्कला 'TP 100' असे नाव देण्यात आले आहे. The battery-powered mask will eliminate the corona

हे देखील पहा -

मागील 8 महिन्यापासून अशाप्रकारच्या मास्कच्या संशोधनावर नरसी मोनजी विद्यापीठाचे सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सचे डिन डॉ. नितीन देसाई आणि प्राध्यापक डॉ. वृषाली जोशी मास्क निर्मितीचे काम करत आहेत. सध्या हा मास्क पूर्ण झाला असून त्याचे दोन पेटंट सुद्धा मिळाल्याचे डॉ. नितीन देसाई सांगतात. मास्कची निर्मिती स्वत: नरसी मोनजी विद्यापीठ करणार आहे. मार्केटिंग विभागामार्फत या मास्कची किंमत ठरवली जाणार आहे. याची किंमत 800 ते 1000 रुपयांपर्यंत असणार असल्याचे डॉ. नितीन देसाई सांगतात आणि या मास्कची वॉरंटी तब्बल एका वर्षाची असल्याचे सांगण्यात आले आहे.

'TP 100' मास्क' कसा कार्य करतो ?

हा मास्क दोन लेअरमध्ये आहे. तर या मास्कच्या आत कॉपरची एक जाळी आहे आणि ती जाळी बॅटरी सोबत जोडली आहे. या जाळीला कॉपर फिल्टर असं म्हणतात. सामान्य मास्क एअर फिल्टर करतं मात्र विषाणू नष्ट करु शकत नाही. TP 100 या मस्कमध्ये घडाळ्यचे सेल असलेलं एक सॉकेट आहे. ते सॉकेट कॉपरच्या जाळीला जोडलं गेलं आहे. सॉकेटचं बटन दाबताच त्यातून 3 वोल्टचा करंट सप्लाय होतो. त्यामुळं जर मास्कवर एखादा विषाणू आला तर तो तात्काळ करंटमुळे न्युट्रल म्हणजेच नष्ट होतो. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला प्रोटेक्शन मिळते. The battery-powered mask will eliminate the corona

सामान्य मास्क आपण वॉश करुन पुन्हा वापरू शकतो. तसंच युस एण्ड थ्रो वाले मास्क आपण वापरून फेकून दिल्यास बायो गार्बेजची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र हा मास्क वॉशकरु शकतो. तीन वोल्टचा सप्लाय दिल्यामुळं शरीराला ईजा होणार नसल्याचे देखील नितीन देसाई यांनी सांगितले आहेत.त्यामुळं हा मास्क पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT