मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हल्ला करणारे ११ जण दारूच्या नशेत होते, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात ८१ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील ११ जणांनी दारूचे सेवन केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही एसटी कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्या होत्या. या हल्ल्यातील काही आंदोलक दारू प्यायले होते, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी ८१ जणांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. तपासणी अहवालात ११ जणांनी दारूचे सेवन केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
हे देखील पहा -
मुंबई पोलीस सूत्रांनी सांगितले की, ''७ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या घरी एक बैठक झाली होती. बैठकीनंतर 'नॉनव्हेज पार्टी' झाली. त्याचवेळी आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यावर, म्हणजेच शरद पवार यांच्या घरी आंदोलन करण्याचे ठरले.'' आंदोलनासाठी सुमारे ३६ ते ४० जण आझाद मैदान येथून बेस्ट बसने महालक्ष्मी येथे पोहोचले होते, तर काही आंदोलक टॅक्सीने आले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांना 'हा' संशय
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे आंदोलन केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. याशिवाय वकील सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले होते. त्या पैशांतून आझाद मैदानावर लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. आझाद मैदानातील (Azad Maidan) अनेक स्वयंसेवी संस्था या सर्व आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करत होते, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे पैसे बहुतांशी रोखीने आल्याचे तपासात समोर आले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.