कृष्ण प्रकाश गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

दोनशे कोटींच्या आरोपाचे 'ते' व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदावर असताना कृष्ण प्रकाश यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे एक पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड मध्ये पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे एक खोटे तक्रारी पत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे (Ashok Dongare) यांच्या नावाने तयार करून ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर ह्या पत्रात संदर्भात स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी खुलासा केला. हे खोटे पत्र लिहणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार डोंगरे यांनी पोलीस आयुक्तांकडे दाखल केली आहे.

हे देखील पाहा :

आपल्या तक्रारीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी नमूद केले आहे कि, "तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या विरोधात माझे नाव वापरून बनावट तक्रारी अर्ज तयार करण्याचा कट रचण्यात आला आहे. अशाप्रकारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या विरोधात कट रचून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करण्यात आली. अशा प्रकारच्या कटाला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी."

यासंदर्भात पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः खुलासा करत म्हटले आहे कि, "पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे.

सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम, आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी लोकांच्या आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे. तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की “मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो. त्याला धक्का लावणे माझ्या कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही. “

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT