ठाण्यातील काही भागांत पाणी पुरवठा बंद
महापालिका क्षेत्रात 36 तासांसाठी शटडाऊन
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा
thane water crisis water supply disruption in residential areas : यंदा पाऊस कमी पडल्यानं महाराष्ट्रावर पाणीसंकट घोंघावत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कपातीचा निर्णय घेतला असून, ठिकठिकाणी शटडाऊनही घेतला जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही पाणीबंदीचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा, कळवा, माजिवडा, दिवा येथील काही भागांत 36 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळेमधील काही भागांत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी अल निनोचा प्रभाव आणि त्यामुळं झालेला कमी पाऊस, तसेच मान्सूनने लवकरच माघार घेतल्यानं भविष्यकाळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असे एकूण 36 तास बंद राहील.
या 36 तासांच्या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
36 तासांनी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असला तरी, त्यानंतरचे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीकपातीच्या कालावधीत नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.