Thane news  Saam tv
मुंबई/पुणे

Thane Water supply : ऐन उन्हाळ्यात ठाण्यात पाणीबाणी; 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कोणत्या भागात?

Thane Water supply News : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्यात २४ तासांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

विकास काटे

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी

ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

शहरातील बहुतेक भागांना बसणार फटका

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्यात पालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. माजिवडा जंक्शन येथे ही गळती होतेय. या गळतीने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय. ही गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा,पंचगंगा, राबोडी 1 व 2,

आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. 3 परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरानगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझादनगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकारआळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स

आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. 1 व 2, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्रीपार्क, सिध्दांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगरपरिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र

रुणवॉल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्नगर पाडा नं. 2, शास्त्रीनगर नं. 2, आर्य क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुलेनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हील हॉस्प‍िटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. 2

तत्पूर्वी, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला कायद्यापुढे झुकावंच लागलं - तृप्ती देसाई

Gold Mangalsutra Designs: सोन्याच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, गळ्यात दिसतील शोभून

भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू, 6 वर्षाच्या मुलीचे छत्र हरपले; मन हेलावून टाकणारी घटना

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

Nashik : सापाची कात, पक्ष्यांचे अवयव अन्...; महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू एरंडेचा नवा कारनामा, ऑफिसमध्ये सापडल्या आक्षेपार्ह वस्तू

SCROLL FOR NEXT